कोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा जेरबंद
कामशेत :
कोथुर्णे तील अल्पवयीन मुलीचे अपहरण करणा-यास जेरबंद करण्यात आले.कामशेत लीस स्टेशन हददीत मौजे कोथुर्णे ता. मावळ जि. पुणे या गावात एका अल्पवयीन मुलीचे कोणीतरी तिचे राहते घरासमोरुन अपहरण केलेबाबत तिचे वडीलांनी पोलीस स्टेशनला येवून माहीती दिली होती. सदर प्रकरणाचे गांभीय लक्षात घेवुन वडीलांचे तक्रारीवरून कामशेत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११७ / २०२२ भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला. पोलीस अधिकारी व अमलदार हे तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी जावुन त्यांनी संपुर्ण गावात अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरु केला.
या  ठिकाणी मा. डॉ. श्री. अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री मिलींद मोहीते सोो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. श्री. भाऊसाहेब ढोले सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग अति. कार्यभार लोणावळा विभाग यांनी गुन्हा घडले ठिकाणी भेट देवुन अपहरण झालेल्या मुलीचा संपुर्ण गावात शोध घेवून तपासाला गती देण्याकरीता पोनि अशोक शेळके सोो, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक सोर, संजय जगताप, पोनि, विलास भोसले, वडगांव मावळ पोलीस स्टेशन, सहा. पोलीस निरीक्षक, आकाश पवार, सपोनि गंधारे, सपोनि बावकर, पोसई चौधरी, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा, सपोनि माने, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे नेतृत्वात वेगवेगळी तपास पथके तयार केली.
तपास पथकामार्फत अपहरण झालेल्या मुलीचा शोध सुरु असताना कोंथुर्णे गावातील जि. परिषद शाळेच्या पाठीमागील बाजुस अपहरण झालेली मुलगी ही संशईत रित्या मृत अवस्थेत मिळून आली. त्यामुळे गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन पोलीसांनी सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करुन गुन्हा घडले पासुन ” चोवीस तासाच्या आतमध्ये ” आरोपी तेजस उर्फ दादा महीपती दळवी वय २४ वर्षे यास जेरबंद करण्यात कामशेत पोलीसांना यश आलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा. डॉ. श्री. अभिनव देशमुख सोो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. श्री मिलींद मोहीते सोो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा. श्री. भाऊसाहेब ढोले सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग अति. कार्यभार लोणावळा विभाग यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोर, संजय जगताप, सहा. पोलीस निरीक्षक, आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक, शुभम चव्हाण, सहा फौजदार, प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पो. हवा. हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, पो, ना, समाधान नाईकनवरे पो. कॉ. प्राण यवले, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रामीण व सहा. फौजदार समीर शेख, पोलीस हवालदार, तावरे ब. नं. १८५४, दिक्षीत ब. नं. १९९८, बनसोडे ब. नं. २९४, राय, १९९६, पो. ना. हिप्परकर, ब. नं. २६०७ कळसाईत ब. नं. २६०५, आशिष झगडे ब नं. २४४४, रविंद्र राऊळ ब. नं. ३०३४, होमगार्ड प्रशांत कटके, किसन बोंबले यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.

error: Content is protected !!