कामशेत:
पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळयात अपघात जखमी झालेल्या साते गावातील  तरुणावर चार यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात डाॅक्टरांना यश आले. अंत्यत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर या तरूणाला डिस्चार्ज देण्यात आला. कुटूंबातील मंडळींनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद,अपघातग्रस्त तरूणाचे मनोबल आणि डाॅक्टरांचे प्रयत्न याला यश आले असल्याचे महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी सांगितले.
मागील महिन्यात एसटी बसने दुचाकीला दिलेल्या अपघातात हा तरूण गंभीररीत्या जखमी झाला होता. अविनाश कैलास आगळमे असे अपघातात जखमी झालेल्या तरूणाचे नाव.दुचाकीला बसने दिलेल्या अपघातात अविनाशला मोठी दुखापत झाली होती.
त्याच्या डोक्याला मार लागला होता. मणक्यात मोठी दुखापत झाली होती. बरगड्यांना मार लागला होता. हात,पाय आणि तोंडावर अनेक जखमा झाल्या होत्या. एक हात निकामी झाला असल्याचे प्रथम दर्शनी जाणवत होते. हा अपघातग्रस्त तरूण अनपेक्षित पणे चालत घरी जाईल की नाही अशी शंका बळावली होती. परंतु डाॅ.विकेश मुथा आणि टीम यांनी देवावर भरोसा ठेवून केलेले उपचार निश्चित कौतुकास्पद आहे.
डिस्चार्ज घेऊन घरी जाताना महावीर हाॅस्पिटलच्या वतीने त्याचा औक्षण करून सत्कार केला. त्यावेळी त्याचे डोळे पाण्याने भरलेले होते.
अविनाश यांच्या उपचारानंतर आगळमे परिवाराने डाॅक्टरांचे आभार मानले. गंभीर रित्या जखमी असलेल्या अविनाश याची मेंदू,तोंड,छाती आणि हाताची शस्त्रक्रिया केली. गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रिया महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांच्या मार्गर्शनाखाली डाॅ.प्रशांत कुलकर्णी,डाॅ. मनोज दिघे,डाॅ. हर्षद सोमजी,डाॅ. शैलेश शहा यांनी केल्या. महावीरच्या स्टाफने अंत्यत सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा केली असल्याचे आगळमे यांनी सांगितले.
महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करताना कुटूंबातील मंडळीचे निर्णय महत्वाचे ठरले. घरच्यांनी आशा सोडली होती,परंतू त्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे आम्ही योग्य प्रकारे औषधोपचार करू शकलो. योग्य औषधोपचाराने अविनाश लवकर बरा होईल अशी अपेक्षा आहे.

error: Content is protected !!