वडगाव मावळ:
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते  अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ  तालुक्यात सुरू असलेल्या ‘अजित  स्वाभिमान सप्ताह’ मध्ये मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना २५००  वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे.या वहीचे प्रकाशन आमदार  सुनिल शेळके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,कार्याध्यक्ष साहेबराव कारके यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष किशोर सातकर, रा. गा. नि. यो. अध्यक्ष नारायण ठाकर, स. तु. स. सा. कारखाना संचालक अंकुश आंबेकर, ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष अतुल राऊत, तालुका प्रवक्ते राज खांडभोर , ग्रामीण अध्यक्ष आशिष ढोरे, विद्यार्थी कॉ.अध्यक्ष समीर कदम विद्यार्थी कार्याध्यक्ष आशिष माने, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष अजिक्य टकले,विद्यार्थी उपाध्यक्ष सुशांत बालगुडे, नाणे मा.अध्यक्ष अजय मांडेकर प्रणव भोसले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!