कोथुर्णे गावातून सात वर्षीय मुलगी बेपत्ता
कोथुर्णे:
कोथुर्णे येथील सात  वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वरा जनार्दन चांदेकर (वय ७) असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. गावातील मंदिरासमोर खेळत असलेली ही मुलगी आज मंगळवार (दि. २) रोजी दुपारी २ ते ३ च्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच गावातील नागरिकांसह तिचे आई, वडील व नातेवाईक
तिला शोधायचा प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोथुर्णे (ता. मावळ)आपल्या निवासस्थानालगत  गावातील असलेल्या भैरवनाथ मंदिरासमोर ही मुलगी नागपंचमी निमित्त शाळेला सुट्टी असल्याने आज मंगळवार (दि. २) रोजी २ च्या सुमारास खेळत होती. त्यानंतर घरातील साफसफाई उरकल्यावर स्वराची आई दु. ३ च्या सुमारास तिला शोधण्यासाठी आली असता, तिला स्वरा दिसून आली नाही.
त्यानंतर गावकऱ्यांसमवेत तिच्या आई वडिलांनी संपूर्ण गावामध्ये तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ती आढळून आली नाही. या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. बेपत्ता मुलीच्या अंगावर वरील फोटोतील ड्रेस आहे व ती मराठी भाषा बोलते.
सदर बेपत्ता मुलगी कोणाला आढळून आल्यास तात्काळ कामशेत पोलिसांना (९७६४२२३२२६) या नंबरवर कळवावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या वतीने करण्यात आले.

error: Content is protected !!