कान्हे:
श्री. छत्रपती शिवाजी विदया मंदिर अँड ज्युनियर कॉलेज, कान्हे येथे सॅनेटरी पॅड डिस्पेन्सर व डिस्पोजर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
महिंद्रा अ‍ॅक्सेलो कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट कमर्शियल दिवाकर श्रीवास्तव आणि प्लांट चीफ लक्ष्मण महाले यांच्या माध्यमातून शाळेला ३ लाख रुपयांचा CSR निधी उपलब्ध करण्यात आले.
महिंद्रा अ‍ॅक्सेलो यांच्या सामाजिक दातृत्वाच्या माध्यमातून कान्हे मावळ  येथील श्री. छत्रपती शिवाजी विदया मंदिर अँड ज्युनिअर कॉलेज येथे  सॅनेटरी पॅड डिस्पेन्सर व डिस्पोजर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
महिंद्रा अक्सेलो कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट कमर्शियल दिवाकर श्रीवास्तव आणि प्लांट चीफ लक्ष्मण महाले यांच्या माध्यमातून हा कायमस्वरूपी प्रकल्प सुरू करण्यात आला व त्याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री. पांडुरंग ठाकर सर,ज्येष्ठ अध्यापक श्री. भाऊसाहेब आगळमे सर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फ्रिडा फर्नाडीस (एच आर ) , आरती यादव, स्वीटी नायक , रेश्मा नायर(एच.आर),  जगदीश परब सर,  अभिजित जाधव ( सिनियर एक्सिकेटिव कमर्शियल),
पांडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापिका सौ.सुमन जाधव मॅडम यांनी केले.
या प्रकल्पाची एकूण किंमत ३ लक्ष रुपये एवढी असून प्रत्येकी २ सॅनिटरी पॅड डिस्पेन्सर आणि डिस्पोजर मशिन्स कार्यान्वित करण्यात आल्या असून १ वर्ष पुरतील एवढे सॅनिटरी पॅड देखील शाळेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून फ्रीडा फर्नाडीस यांनी मुलींना मशीन वापराबद्दल  मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. सोमनाथ साळुंके सर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन राम कदमबांडे, रियाज तांबोळी,लक्ष्मण सातकर,किरण गवारे,राजेंद्र भालेकर,सुप्रिया पुंडले,श्रद्धा तुपे,कविता येवले,वर्षा पोखरकर, सची दगडे व पवार मॅडम यांनी केले.

error: Content is protected !!