
टाकवे बाजारपेठेतील तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी २७ हजार रुपये लंपास
टाकवे बुद्रुक :
टाकवे बु. येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या तीन दुकानांमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी रात्री चोरट्यांनी बाजारपेठेतील परदेशी हार्डवेअर, क्षिरसागर सलून आणि राजलक्ष्मी कलेक्शन या तीन दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याच प्रयत्न करण्यात आला. यापैकी राजलक्ष्मी कलेक्शन मधील २७ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दोन महिन्यापुर्वीच टाकवे गावातील एका घरातील २५ तोळे चोरीला गेल्याची घटना ताजी असताना आशा छोट्या मोठ्या घटना घडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे गावातील सीसीटीव्ही फक्त शोभेलाच आहे का..? असा संतप्त सवालही नागरिक सोशल मिडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. तर टाकवे बाजारपेठ ही आंदर मावळ परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने याठिकाणी उपाय योजना करणे गरजेचे आहे.
टाकवे नाणे गट अध्यक्ष भाजप रोहिदास असवले म्हणाले,”
गावातील सीसीटीव्ही काही ना काही कारणास्तव बंद पडत आहेत.. सीसीटीव्हीची क्षमता वाढवून गावतमध्ये आजून काही भागात सीसीटीव्ही वाढवणे गरजेचे आहे.व चांगल्या दर्जेचे काम देखील होणे गरजेचे आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


