जनसेवेचे व्रत जोपासणारा पक्ष निष्ठेचा खरा वारसदार
मावळमित्र न्यूज विशेष:
वडील गावचे सरपंच अन आई गृहिणी.शेतीत काबाडकष्ट करायचे आणि जनतेची सेवा करायची हे त्यांचे व्रत.जनसेवेचे व्रत जोपासणाऱ्या आई वडिलांकडून गावातील आणि पंचक्रोशीतील समस्या ऐकत ऐकत या तरूणाचे बालपण गेले. आणि तरूण  पणात पोटतिडिकीने सर्वसामान्यांच्या व्यथा सोडवायला या तरूणाने कंबर कसली. त्याच्या या प्रयत्नांना यशही मिळत गेले.त्यामुळे त्याचा ‘आत्मविश्वास’ बळावला. विद्यार्थी संघटने पासून सुरू केलेला राजकीय प्रवास पंचायत समितीच्या उमेदवारी शिक्कामोर्तब झाला.
राजकारणाच्या पटलावरील या तरूणाचे नाव आपल्या सर्वाना सुपरिचित आहे. तो तरूण म्हणजे टाकवे बुद्रुक येथील शिवाजी चिंधू असवले.आंदर मावळा सारख्या दुर्गम आदिवासी भागात ‘ज्ञानदानाचे’ पवित्र कार्य करण्यासाठी धडपड करणारा तरूण.या ही तरूणाची परिस्थिती सर्वसामान्य शेतकरी कुटूंबा सारखीच.बालवयातच जबाबदारीचे ओझे त्याने आपल्या खांद्यावर घेतले. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा सारख्या कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून त्याने करिअरला सुरूवात केली. कंत्राटी कामातील कमाईतून त्याने स्वतःचा केबल नेटवर्कचा व्यवसाय सुरू करून आपल्या सह चार जणांना रोजगार उपलब्ध करून दिला.
मुळातच संघटन कौशल्याचे बाळकडू असलेल्या शिवाजी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर ‘राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ‘पक्षात सक्रीय सहभाग घेऊन पक्ष संघटनेसाठी गावगाव पिंजून काढले. आंदर मावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पद घेतलेल्या शिवाजी असवले यांनी टाकवे बुद्रुक,फळणे,कचरेवाडी,घोणशेत,कशाळ,माळेगाव खुर्द अशा एक ना अनेक गावात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखा स्थापन केल्या. माजीमंत्री मदन बाफना साहेब,माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष कै.राजाराम राक्षे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कै.नेताजी घोजगे यांच्या समवेत केलेल्या पक्ष संघटनेच्या कामाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी घेऊन शिवाजी असवले यांच्या वर आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
पक्ष संघटनेत काम करताना आदरणीय बाफना साहेब,भेगडे साहेब यांच्यासह आमदार सुनिल( अण्णा)शेळके,ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब भेगडे यांचे मार्गदर्शन घेत ग्रामीण भागातील समस्या हिरीरीने सोडवण्यासाठी पुढाकार घेतला.काही उदाहरणे द्यायची म्हटले तर कान्हे वडेश्वर या रस्त्यावर टाटा पॉवरची मालकी होती. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर होणे अडचणीचे होते. या रस्त्यावरील टाटाचा मालकी हक्क काढून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावा यासाठी शिवाजी असवले  यांच्या नेतृत्वाखाली अंदोलन झाले,तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.छगन भुजबळ साहेब यांच्या कडे
केलेला पाठपुरावा आपणांला दिसेल.
पक्ष संघटनेत काम करणारे शिवाजी असवले यांना मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस पदावर संधी मिळाली. पक्ष  संघटनेचे पद फक्त मिरवण्यासाठी याची जाणीव असलेल्या शिवाजी यांनी कोंडिवडे गावाजवळ अंद्रायणी नदीवर पूल बांधावा यासाठी केलेला अट्टाहास आपल्याला दिसेल,शिवाजी असवले इतक्यावर थांबले नाही,ग्रामीण भागातील रस्ते,शाळा,वीज,पाणी पुरवठा,आरोग्य असे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आग्रही होते आणि आजही आहे. कुटुंबातच सामजिक प्रश्न सोडवण्याचे बाळकडू मिळाल्याने थांबले ते शिवाजी असवले कसले. एकीकडे घर प्रपंच आणि व्यवसाय संभाळत,ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी त्यांनी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. या संस्थेच्या बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती हायस्कूलमधील कित्येक विद्यार्थी ज्ञानदानाचे धडे गिरवून बाहेर पडले.आज हे विद्यार्थी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहे.ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणा-या शिवाजी असवले उत्तम मल्ल म्हणून लालमातीच्या मैदानावर कित्येक कुस्त्या चितपट केल्या आहे.क्रिकेटच्या मैदानात त्यांची  खिलाडू वृत्ती दिसली.
त्यांच्या  सर्वसमावेशक नेतृत्वावर ग्रामीण भागातील जनतेने शिक्कामोर्तब केले,हे मान्य करावे लागले. त्याचे पहिले कारण शिवाजी यांचे वडील गावचे उपसरपंच होते,नंतर सरपंच झाले. पत्नी अश्विनी शिवाजी असवले उपसरपंच होत्या. स्वतः शिवाजीभाऊ टाकवे बुद्रुक विविध सेवा सहकारी संस्थेचे संचालक आहे. इतकेच काय मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अपयश आले. अपयशात खचून घरात बसले ते शिवाजीराव  कसे  त्यांनी जनसेवेचे हे व्रत आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गर्शनाखाली सुरूच ठेवले.याची पोचपावती म्हणून ग्रामपंचायतीच्या मागील  दोन पंचवार्षिक निवडणुक शिवाजी असवले यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या. आणि या वर्षी झालेली टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी खारीचा वाटा त्यांनी उचला. हे सगळे आज मांडण्याचे कारण काय,असा प्रश्न आपल्याला पडला असेल.त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगावे असे काही नाही,ते आपण जाणता आहातच.
(शब्दांकन- अनिल बंडू असवले अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती व
स्वामी जगताप,माजी उपसरपंच टाकवे बुद्रुक)

error: Content is protected !!