लोणावळा : वाकसई येथील युवा कार्यकर्ते व वाकसई ग्रुप ग्रामपंचायतचे पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी विशाल सुरेश केदारी(वय ३१)यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडिल, भाऊ, पत्नी, मुले, भावजय, पुतणे, पुतण्या, चुलते, मामा असा मोठा परिवार आहे. जगदगुरू संत तुकाराम महाराज पतसंस्थेचे संस्थापक व राष्ट्रवादीचे नेते अमोल केदारी यांचे ते लहान भाऊ होते.वाकसई विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सुनिता केदारी यांचे ते लहान दीर होते. त्यांच्या अचानक जाण्याने केदारी परिवारासह वाकसई गावावर शोककळा पसरली आहे. वाकसई येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

error: Content is protected !!