
कोथुर्णे विकास सोसायटीत ज्ञानेश्वर दळवीना आणखी एक धक्का
पवनानगर:
कोथुर्णे विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मावळ तालुक्याचे माजी सभापती व भाजपचे जेष्ठ नेते ज्ञानेश्वर दळवी यांच्या विरोधात त्यांचा पुतण्याने बंड थोपटले होते,या पुतण्याने काकाला आणखी धक्का दिला.
संतोष दळवी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ परिवर्तन पॅनलने बारापैकी आठ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापीत केले. तर ज्ञानेश्वर दळवी यांना चार जागांवर समाधान मानावे लागले.
1980 सालापासून त्यांची कोथुर्णे विकास सोसायटीवर एकहाती सत्ता होती. संतोष दळवी यांनी त्यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावला. त्यांच्या निवडून आलेल्या चार संचालकांपैकी दोन सचलकानविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याकरिता संतोष दळवी यांनी अर्ज केला होता.
पैकी ज्ञानेश्वर रामचंद्र निंबळे यांना 2001नंतर तीन आपत्ये असल्याने व शीतल शिवाजी ढोले यांच्या नावावर सहकार कायाद्यानुसार 10गुंठे किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र नसल्याने या दोन्ही संचालकांना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ यांनी अपात्र ठरविले आहे.
त्यामुळे संतोष दळवी यांनी कोथुर्णे विकास सोसायटीत ज्ञानेश्वर दळवी यांना आणखी एक धक्का दिल्याचे मानले जात आहे.
- शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
- वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने जल समाधी अंदोलन
- गावपातळीवरील विकासाची दूरदृष्टी असलेला सहकारी हरपला: सरपंच नामदेवराव शेलार
- शिवसेनेच्या वतीने तळेगावात निषेध सभेचे आयोजन
- संस्कार प्रतिष्ठानचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत


