तळेगाव दाभाडे:
येथील  नविन समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे सुवर्ण यश विद्यालयासाठी भूषणावह आहे. तिच्या या यशाबद्दल आम्हाला सार्थ अभिमान असल्याच्या भावना विद्यालयातील गुरुजनांनी व्यक्त केल्या.  विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कुमारी हर्षदा शरद गरुड मावळची सुवर्णकन्या तिचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, यावेळी तिच्या गुरुजनांना आकाश ठेंगणं झाले.
ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये हर्षदा गरुड ने सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. या सत्कार समारंभास विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा, हर्षदा गरुड,तीचे वडील शरद गरुड ,शरयू मांढरे ,विद्यालयाचे प्राचार्य संजय वंजारे, पर्यवेक्षक राजेंद्र वाजे  उपस्थित होते.
विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर तिचे औक्षण करण्यात आले प्रवेशद्वारापासून व्यासपीठापर्यंत तिच्यावर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी केली.
नाशिकढोलच्या गजरामध्ये तिचे आगमन विद्यालयामध्ये झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष महेश  शहा यांनी केले यावेळी बोलताना ते म्हणाले ,हर्षदा चे यश आमच्या संपूर्ण नवीन समर्थ विद्यालय यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे हर्षद आणि मिळविलेले उत्तुंग व सुवर्ण यश निश्चितच संपूर्ण देशासाठी गौरवाची गोष्ट आहे संपूर्ण जगभरात क्रीडा जगतात आपल्या भारत देशाचे नाव उंचविणारी हर्षदा आमच्या नवीन समर्थ शाळेची माजी विद्यार्थिनी आहे याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो भविष्यकाळात तिची उत्तरोत्तर प्रगती व्हावी व तिच्या कडून अशाच प्रकारे देशाची उत्तुंग सेवा घडावी ह्याशुभेच्छा
सन्मानचिन्ह शाल-श्रीफळ बुके देऊन हर्षदा चा विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना हर्षदा म्हणाली, मी या शाळेत शिकले याचा मला अभिमान वाटतो. नविन समर्थ विद्यालयाला उत्तुंग असा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे एकशे सोळा वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली माझी शाळा .या शाळेने स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे सारखे अनेक देशभक्त घडविले या शाळेची विद्यार्थिनी.
  आज मला निश्चितच आनंद होत आहे कि, मी माझ्या देशाचे नाव संपूर्ण जगात अभिमानाने मिरवण्याची निमित्त ठरत आहे यावेळी बोलताना तिने तो अविस्मरणीय क्षण सर्वांसमोर कथन केला .ती म्हणाली, ज्यावेळी माझ्या हातून सुवर्ण कामगिरी झाली आणि माझ्या देशाचा लाख मोलाचा तिरंगा माझ्या अंगासभोवती लपेटून मी सुवर्णपदक स्वीकारण्यासाठी उभी होते. संपूर्ण जगाच्या क्रीडा विश्वात आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत वाजविले केले त्यास मी निमित्त ठरले ही गोष्ट माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ,आनंद देणारी ,खेळासाठी मला ऊर्जा देणारी ठरली.
पुढे विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना ती म्हणाली, मला पण एक माझ्यासारख्याच हर्षदा किंवा हर्षद भविष्यकाळात माझ्यासोबत या विद्यालयातून हवे आहेत जे देशाच्या नावलौकिकात आपापल्या क्षेत्रात अलौकिक कार्य करून भर घालतील आणि आपल्या नवीन समर्थ शाळेचे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध करतील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले तर आभार रेवप्पा शितोळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कसाबी ,सविता चव्हाण ,शारदा वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!