वडगाव मावळ:
माजी उपमुख्यमंत्री व  विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व सेल आयोजित नाविन्यपुर्ण उपक्रम गरजु रुग्णांना घरगुती वापरासाठी अत्यावश्यक सर्जिकल वस्तुंचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
गरजू रुग्णांना बेड, गादी, व्हीलचेअर, ऑक्सिजन सिलिंडर, कमोड चेअर, स्टिक, वॉकर, सलाईन स्टँड, वाफेचे मशिन, पाण्याची गादी, हवेची गादी, स्ट्रेचर ई. साहित्य देण्यात आले.
मावळची सुवर्णकन्या “कु. हर्षदा शरद गरूड” हिने ज्युनियर एशियन वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तिचा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला, या कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन करून पदाधिकारी यांचे वतीने आर्थिक मदत करण्यात आली.
या प्रसंगी आमदार सुनिल शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नगरसेवक बापुसाहेब भेगडे, गणेश आप्पा ढोरे, बाबुराव वायकर, सुभाष जाधव, मंगेशकाका ढोरे, किशोर सातकर, तुकाराम ढोरे, चंदू काका ढोरे, गंगाराम ढोरे, वि. म. शिंदे गुरुजी, बिहारीलाल दुबे, नारायण ठाकर, पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण, विलास दंडेल, डॉ. दिनेश दाते, डॉ. गौरव धंदुके, शांताराम कुडे, सुनिल शिंदे, सुनिल ढोरे, सुरेश जांभूळकर, संतोष खैरे, दिपाली गराडे, सुवर्णा राऊत, पद्मावती ढोरे, सुधा भालेकर, मंगल मुऱ्हे, गणेश म्हाळसकर, किसनराव वहिले, नितीन भांबळ, चंद्रकांत राऊत, प्रकाश कुडे, सुधाकर वाघमारे, सुरेश कुडे, दत्तात्रय घोलप, श्रीधर ढोरे, शैलेश वहिले, संदीप चं ढोरे, सचिन वाडेकर, यशवंत शिंदे, महेश कुडे, निलेश म्हाळसकर, आप्पा आखाडे, विकी ढोरे, अंकुश तूमकर, भाऊ कराळे, संजय दंडेल, पुरंदर शेट्टी, पंकज भामरे, विकी भोसले, आदी उपस्थित होते.
वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे व उद्योजक राजेश बाफना यांच्या संकल्पनेतून एक हात मदतीचा कार्यक्रमाचे नियोजन राजेंद्र कुडे, अतुल राऊत, प्रविण ढोरे, विशाल वहिले, आफताब सय्यद, मंगेश खैरे, अतुल वायकर, मयुर गुरव, सोमनाथ धोंगडे, नितीन चव्हाण, गणेश पं ढोरे, शरद ढोरे, भाऊ ढोरे, सिद्धेश ढोरे, राहील तांबोळी, मजहर सय्यद, केदार बवरे, व सर्व सेलच्या पदाधिकारी यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रविण ढोरे, स्वागत शरद ढोरे, सूत्रसंचालन अतुल राऊत, आभार सिद्धेश ढोरे यांनी केले.

error: Content is protected !!