तळेगाव दाभाडे:
त्या अंध आणि अनाथ लेकी..त्यांच्या सर्वागीण विकासासाठी झोकून देणा-या माईही त्यांना सोडून गेल्या.पण त्यांना स्वावलंबनाचे धडे दिले जात आहे. ते ही शासनाच्या मदती विना.त्यांची दृष्टी हरपली असली तरी त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन सर्वाच्या डोळ्यात अंजन भरीन असा आहे.अशा संस्थेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
दादा, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोख रक्कम, आवश्यक किराणा साहित्य आणि छत्रीचे वाटप केले. माई बालभवन, शिरगाव असे या संस्थेचे नाव असून येथील अनाथ व दिव्यांग मुलांच्या संस्थेस आज जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली.या संस्थेतील अंध व अनाथ लेकींना  धाडसाने उभे करण्यासाठी झटणा-या माई गेल्या, त्यांच्या पश्चात  इंगळे भाऊ या  कामी झटतात. इंगळे यांच्या या कष्टाचे चीज होत आहे.
अंध असूनही या संस्थेतील  सहा जणींनी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत चमकदारी कामगिरी केली. येत्या काळात त्या फूटबॉल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप हवी अन कौतुका सोबत मदतही ही माहिती घेत शासनाच्या कोणत्याही मदती विना भाड्याच्या खोलीत चालणा-या अंध संस्थेला राष्ट्रवादीने  मदतीचा हात देत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस साजरा झाला.
  ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असे ब्रीद असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे वाढदिवस गरीब,गरजू आणि अपेक्षित घटकांमध्ये जाऊन करा या पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यानी केल्याचे चित्र आज मावळ तालुक्यात पहायला मिळाले. शिरगाव येथील अनाथ व दिव्यांग मुलांच्या संस्थेस आज जीवनावश्यक वस्तूंची भेट देण्यात आली,छत्री वाटप करण्यात आले व संस्थेस  देणगी देण्यात आली.
   राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुक्याचे अध्यक्ष  गणेश खांडगे, इंदोरी, माळवाडी गावचे उपसरपंच चंद्रकांत दाभाडे, सोमाटणे गावचे माजी उपसरपंच नितीन मुऱ्हे, राष्ट्रवादी यु. काँ. मावळ तालुक्याचे कार्याध्यक्ष सचिनदादा मुऱ्हे, राष्ट्रवादीचे संघटन सरचिटणीस रामदास वाडेकर, राष्ट्रवादी काँ. मावळ ता. सरचिटणीस बाळासाहेब काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका उपाध्यक्ष शिवाजी टिळेकर, देहूचे माजी सरपंच कांतीलाल काळोखे, देहू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विकास कंद, देहू रा. कॉ. महिला आघाडी अध्यक्ष सौ. रेश्माताई मोरे, देहू राष्ट्रवादी यु. काँग्रेस अध्यक्ष उमेश हगवणे, कार्याध्यक्ष सोमनाथ चव्हाण, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत सुतार, देहूचे माजी उपसरपंच अभिजीत  काळोखे, नगरसेवक आनंदाशेठ काळोखे, उद्योजक सुनील काळोखे,  राष्ट्रवादी काँ. खजिनदार चंद्रकांत भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मा. अध्यक्ष योगेश मोरे, देहू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडी प्रसिद्धीप्रमुख सुगंधाताई कारंडे,राष्ट्रवादी यु. काँग्रेस कार्याध्यक्ष रोहन काळोखे, उद्योजक मयूर मोरे उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश  खांडगे यांनी मनोगत व्यक्त करताना माई बालभवन संस्थेच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. अशी सामाजिक संस्था उभी करणे यासाठी खूप कष्ट व साधना आवश्यक असते. याच साधनेतून ही संस्था आज अतिशय चांगल्या पद्धतीने अनाथ व दिव्यांग मुला-मुलींसाठी चांगले शिक्षण व त्यांच्या कला कौशल्यांना वाव देत आहे असे स्पष्ट केले.
तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,”आपले हे सेवाकार्य पाहून निश्चितपणे हृदय भरून येते. आमच्या नेत्यांचा वाढदिवस अशा सेवाभावी संस्थेत सेवाकार्य करून अशा पद्धतीने साजरा होतोय याचाही मनापासून आनंद होत आहे. अशा भावना व्यक्त करून या पुढील काळात आपल्या संस्थेस उभारणीसाठी चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे विश्वासपूर्ण शब्द याप्रसंगी त्यांनी दिला.
माईबाल भवन संस्थेचे प्रमुख इंगळे दादा यांनी सामाजिक कार्यकर्ते ज्यावेळी आमच्यासारख्या संस्थेला भेट देतात त्यावेळी निश्चितपणाने संस्थेतील सर्व मुला मुलींनाही मनापासून आनंद होतो. त्यांच्या कार्याचे कौतुक केले असता त्यांना प्रेरणा मिळते अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कंद यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ चव्हाण यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले.

error: Content is protected !!