तळेगाव दाभाडे:
आषाढ वद्य नवमी दिनी  विष्णू गोविंद देशपांडे तथा अण्णासाहेब विजापूरकर यांचे ९६ व्या पुण्यस्मरणानिमित त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यात आला. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या समर्थ विद्यालयात विजापूरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पारतंत्र्याच्या काळात १९०६ साली राष्ट्रीय शिक्षणाचे सूत्र हाती घेऊन महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी राष्ट्रीय शिक्षण देणारे नवीन समर्थ विद्यालय स्थापन केली मातृभाषेतून अध्ययन उपासनेस आणि व्यवसाय शिक्षणास प्राधान्य देणारे हे विद्यालय नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेची ही प्रथम शाळा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या संस्थेचे प्रथम अध्यक्ष होते.
तर गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर हे संस्थापक चिटणीस पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रीय चळवळीस हातभार लावणारी आणि देशभक्त या विद्यालयाने घडविले क्रांतिरत्न विष्णू गणेश पिंगळे या नवीन समर्थ विद्यालया चे माजी विद्यार्थी  होते.  गुरुवर्य अण्णासाहेब विजापूरकर यांचे 96 वे पुण्यस्मरण यानिमित्ताने विद्यालयात गुरुवर्य अण्णासाहेबांच्या स्मृतीस  नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष मा श्री गणेशशेठ खांडगे, संस्थेचे सहसचिव मा श्री नंदकुमारजी शेलार , प्रगती विद्या मंदिर या शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री दामोदरजी शिंदे ,श्री एकविरा विद्या मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष श्री सोनबा गोपाळे सर ,पैसाफंड प्राथमिक शाळेचे शालेय समिती अध्यक्ष श्री विनायक अभ्यंकर ,नूतन इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य श्री वधवा सर, NCER इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्य सौ पांडे , गुणवंत कामगार व पर्यावरणप्रेमी श्री पानसरे ,समर्थ विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय वंजारे, पर्यवेक्षक श्री राजेंद्र वाजे तसेच संस्था पदाधिकारी  यांनी अभिवादन केले.

error: Content is protected !!