वडगाव मावळ:
  नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या वतीने वडगाव कातवी येथील रहिवाशांसाठी मोफत आधारकार्ड अभियान राबविण्यात येत आहे, महिनाभर चालणा-या या अभियानात गरजूंनी आधारकार्डशी संबंधित कामे करून घ्यावीत असे आवाहन प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केले आहे.
या उपक्रमात नवीन आधार कार्ड काढून मिळणार आहे.तसेच आधार कार्ड मधील सर्व प्रकारची दुरुस्ती केली जाणार आहे. याव्यतिरिक्त शहरामधील पहिल्या शंभर मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेची पोस्ट खाते फ्री काढून दिली जातील. हा उपक्रम संपूर्णपणे मोफत आहे.
हा उपक्रम १९ ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत सकाळी १० ते सांय ५ यावेळेत नगराध्यक्ष मयुर ढोरे जनसंपर्क कार्यालय, राजमुद्रा मार्ट शेजारी, वडगाव मावळ येथे सुरू आहे.
तरी शहरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क करा:
८३२९८७८७२२ / ९८२२८३८८२३

error: Content is protected !!