
सामाजिक बांधिलकी जपत युवा उद्योजक नितीन चव्हाण यांच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांना छत्री व एलईडी बल्प वाटप
वडगाव मावळ:
वडगाव नगरीतील युवा उद्योजक श्री. नितीन मारुतराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चव्हाण कुटुंबीय आणि अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने प्रभाग क्रमांक आठ मधील सर्व रहिवाशांना छत्री व एलईडी बल्प वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष मयुर ढोरे, मा. उपनगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका मायाताई चव्हाण, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन चंदुकाका ढोरे, सामाजिक कार्यकर्ते मारुतराव चव्हाण, गंगाधर ढोरे, मा. उपसरपंच अविनाश चव्हाण, दिपक चव्हाण, पत्रकार गणेश विनोदे, अमर चव्हाण, विशाल चव्हाण, निलेश चव्हाण, सिद्धेश ढोरे, केदार बवरे तसेच अष्टविनायक मित्र मंडळाचे कार्यकर्ते, महिला भगिनी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपत श्री नितीन चव्हाण यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून प्रभागातील नागरिकांसाठी समाजपयोगी उपक्रम राबविल्याबददल त्यांचे समस्त मान्यवरांनी कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
- रवि ठाकर एक जिवलग मित्र
- हर घर तिरंगा अभियान गावोगावी राबवणार : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
- हिंदू उत्सव समिती व कामशेत ग्रामस्थांकडून स्वराच्या कुटुंबियास मदत
- सरकार कोणाचेही असो,आमच्या सुरक्षिततेबाबत ही उदासिनता का?
- कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण


