
महागाव:
मावळ तालुका युवक एकता मंच सामाजिक संघटना ,निसर्ग राजा मित्र जिवांचे, व डॉ . बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महागाव पवनानगर या ठिकाणी वृक्षारोपण व वृक्ष वाटप करण्यात आले.
यावेळी संघटनेचे कुणाल ओव्हाळ यांनी संस्थेच्या मागील वर्षाच्या कामाचा आढावा घेतला. मावळ युवक एकता मंच गेली पंधरा वर्षे मावळ तालुक्यात विविध भागात जाऊन वृक्ष वाटप, वृक्षारोपण मोफत करीत आली आहे. तसेच समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आली आहे.
तालुक्यातील सर्व युवकांनी सामाजिक गोष्टीचा भान राखून एकत्र आले पाहिजे त्यातच सामाजिक हेत राखले जाईल.
वृक्ष लागवड गावातील सार्वजनिक ठिकाणी मंदिर, स्मशानभूमी या ठिकाणी अर्जुन, पिंपळ, वड ,कांचन, कडुलिंब, चिंच ,करंज, बेहेडा ,आपटा, बकुळ ,काटेसावर अशा देशी झाडांची लागवड वाटप नऊद ते शंभर वृक्षाची करण्यात आली .
विलास गायकवाड , किरण घोटकुले ,संजय वाघमारे , संपत शेटे ,कुणाल ओव्हाळ, लक्ष्मण शेलार ,अनिल सातकर, राहुल धर्माधिकारी, मारुती साळुंखे, सोपान काटकर ,मिलिंद घोडके, संतोष गायकवाड ,करण सिंह मोहिते , राजु गायकवाड ,महागाव चे सरपंच सोपान सावंत, मा. उपसरपंच पांडुरंग पडवळ, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मरगळे ,लहू पडवळ ,ज्ञानेश्वर कंधारे,ग्रामसेवक भाऊ .एल . साळवे व मोठ्या संख्येने युवक व ग्रामस्थ उपस्थित होते .
सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले. ,प्रस्ताविक कुणाल ओव्हाळ यांनी केले. ,आभार संपत शेटे यांनी मानले.
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या सभासदांचे स्नेहसंमेलन उत्साहात
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप


