
पारवडी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले
वनविभागाचा अडसर,लोकप्रतिनिधींकडून कामाची अपेक्षा
टाकवे बुद्रुक :
टाकवे इंद्रायणी पुलापासून पारवडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. रस्ता वनविभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे रस्ता बनविण्यास वनविभागाचा अडथळा निर्माण होत आहे. तर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले असून जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालवताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची समस्या सुटणार की नाही ? असा प्रश्न येथील नागरिकांपुढे उभा राहिला आहे.
या रस्त्यावरून नाणे मावळ भागातील अनेक कामगारांची बारामाही वर्दळ असते. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात मुसळधार पडणाऱ्या पावसाने रस्त्याचा नाला तयार झाला आहे. रस्ता निसरडा झाल्याने दुचाक्या घसरून अपघात होत आहेत. तसेच चारचाकी वाहन चालकांना वाहन चालवीताना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिक नागरिकांना येथे साधी डागडुजी करण्यास देखील वनविभाग परवानगी देत नसल्याने ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले आहेत.
रोहीत काटकर म्हणाले,”
सदर रस्त्याचा वापर करताना पारवडी – नाणोलीच्या ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच रस्तावरील खड्डयांमुळे काही चार चाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.
- कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण
- महिला अत्याचार रोखण्यासाठी संसदेत कडक कायदा करावा :छत्रपती संभाजीराजे
- उत्कृष्ट मंडल अधिकारी पुरस्काराने माणिक साबळे सन्मानित
- कोथुर्णे मावळ येथील पिडीत कुटुंबीयांची न्यायालयीन लढ्यासाठी स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने २५ हजार रुपयांची मदत
- माजी सरपंच सुदाम वाडेकर यांचे निधन


