मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक विजयकुमार जगदीशराय चावला यांचे निधन
कामशेत :
मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक व टोनी दा ढाबा हॉटेल चे मालक विजयकुमार जगदीशराय चावला यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
टोनीशेठ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेले चावला हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते. कोविड काळामध्ये त्यांनी दररोज पोलिसांना व गरजू व्यक्तींना पाणी फळे जेवण आदि गोष्टी मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या.
त्यांच्या जाण्याने तालुक्यातील हॉटेल व्यवसायामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे सामाजिक कार्य सर्वांना प्रेरणादायी राहील.

error: Content is protected !!