टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या
तज्ञ संचालक पदी सुरेश जांभळे व हरिदास कडू
टाकवे बुद्रुक :
टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या तज्ञ संचालक पदी माऊ येथील सुरेश जांभळे व फळणे येथील हरिदास कडू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी निवडीचे पत्रक संस्थेचे चेअरमन चेरमन पांडुरंग मोढवे,व्हाईस चेअरमन जितेंद्र परदेशी, संचालक मंडळ, सचिव मदन अडिवळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी संचालक योगेश गायकवाड, शिवाजी असवले, विलास मालपोटे, दत्तात्रय असवले, सदाशिव जांभूळकर विकास असवले, तानाजी गुणाट, जालिंदर मालपोटे, सुलाबाई असवले,सुप्रिया मालपोटे, टाकवे गावचे माजी उपसरपंच रोहिदास असवले, ग्राम.पं.सदस्य सोमनाथ असवले, उद्योजक अनिल मालपोटे
ग्रामस्थ, शालेय समिती अध्यक्ष अनिल असवले, माजी तज्ञ संचालक अण्णासाहेब मालपोटे,साहेबराव कडू,आनंद जांभळे, माजी सदस्य गोरख मालपोटे, हभप  गणेश जांभळे, प्रकाश करवंदे, पत्रकार चंद्रकांत असवले, पत्रकार संकेत जगताप, प्रशांत जांभळे, चंद्रकांत सदावर्ते, बाबाजी दवणे, सोसायटी कर्मचारी विठ्ठल कुंभार उपस्थित होते. यावेळी सुरेश जांभळे व हरिदास कडू यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.गणेश जांभळे यांनी  आभार मानले.

error: Content is protected !!