गडद:
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात विशेषता भामनेर,भिमनेर या मावळ पट्यात पर्यटन वाढीला मोठा वाव आहे, या अनुषंगाने येथील विकासाला चालना मिळाली पाहिजे. भामा-आसखेड व चास कमान धरणाचे विस्तीर्ण पसरलेले अथांग पाणी, सह्याद्रीच्या डोंगर कपारीतून खळळून वाहणारे धबधबे, सभोवतालीची हिरवीगार वनराई, हिरव्या कुरणात चरणारी गुरे त्या गुरांन मागे फिरणारा गुराखी जागो जागी भातखासरात चाललेली लय बद्ध आवणी असे विहंगम चित्र डोळ्याला दिसते तर आवणी करत असताना लोकगीताचा रव ही कानाला तृप्त करतो.
आयुष्याच्या चढउतार आणि धकाधकीच्या जीवनात थोडसा आनंद वाटयला यावा म्हणून हजारो पर्यटकांची पावले या निसर्गाच्या ओढीने धावत आहेत. विकेंडला लोणावळा खंडाळा प्रमाणे या परिसरातील गर्दी वाढू लागली आहे. वेडीवाकडी वळणे व चढउताराच्या रस्यावरून जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बळिराजांची भात लावणी सुरू आहे. औतावर बृषभाला घातलेली  साद ऐकताना वेगळाच अनुभव अनुभवत आहे.
भामनेर, भामनेर मधील डोंगरावरून वाहणारे धबधबे म्हणजे वर्षाविहारात भिजण्याची मोठी पर्वणी आहे. मात्र येथे भिजताना सावधानता बाळगावी, धबधब्या पर्यत जाताना वाढलेल्या गवतात विंचू,साप असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा धबधब्याच्या पाण्यातून एखादा दगड पडू शकतो. वळणाच्या रस्त्यावरून जाताना विरूद्ध दिशेने आलेले वाहन दिसत नसल्याने वाहने जपून चालवावी.
पावसाळयात या परिसरात पर्यटकांची गर्दी होत असते,त्यामुळे येथे पर्यटनाला मोठा वाव आहे.राहण्याची,जेवणाची उत्तम सोय केल्यास पुणे व मुंबई सह परिसरातील शहरातून पर्यटकांचा कल निश्चित वाढू लागले. धबधब्यातून धरणाच्या दिशेने वाहत्या पाण्यात सिमेंट च्या पाय-या बांधल्यास त्या पाण्यात झिंब भिजता येईल.ओढयावर बाधरे बांधून ते पाणी अडविणे शक्य आहे.
मुंबई डबेवाले असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणाले,”
पर्यटन विकास वाढीसाठी जे प्रयत्न शक्य आहे, त्यास प्रोत्साहन दिल्यास दुचाकी चारचाकी वाहने पार्किंग सर्व्हिस, कॅम्स मध्ये,हॅाटेल्स, घरगुती खानावळी यात वाढ होऊन स्थानिकांना रोजगार मिळेल या शिवाय या परिसरातील ग्रामपंचायतीने स्वच्छता कर आकारल्यास त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

error: Content is protected !!