
पिंपरी:
अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून भरपाई देण्याबाबत यावी अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.
खासदार बारणे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.
बारणे यांनी जिल्हाधिकारी देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासुन मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असुन या अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने आणि नदी, नाले, धरणभागात आलेल्या पुराने शेतीतील भाताचे रोपे, शेतीचेबांध, शेतीपुरक व्यवसाय (गोटे, पॉलीहाऊस, नर्सरी, पोलट्री इ.) व जोडधंदे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच नागरीकांच्या राहत्या घरांचे अतोनाथ नुकसान झाले आहे. तरी सरदच्या भागातील झालेल्या नुकसानी बाबत त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश मा. तहसिलदार यांना देऊन नुकसान भरपाई देण्या संदर्भात योग्य निर्णय घ्यावा.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन


