सरपंचांची निवड पुन्हा एकदा थेट जनतेतून  शिंदे सरकारचा  निर्णय
मुंबई : राज्यातील पुढील नगरपरिषदा व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात  आला आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयांमुळे पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि सरंपच यांची निवड थेट जनतेतून होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने नगरपरिषदा व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार या निर्णयाला स्थगिती देत पूर्वीची पद्धत पुन्हा लागू केली होती. ज्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांमधून नगराध्यक्ष निवडला जायचा मात्र आता नवे शिंदे सरकार सत्तेत येताच हा नियम बदलला आहे. आता पुढील निवडणुकांमध्ये सरपंच आणि नागराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून होणार आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून कोणीही आले तरी पैशाच्या जोरावर सरपंच किंवा नगराध्यक्षपदं मिळवली जातात. त्यामुळे जो लायक उमेदवार आहे. त्याला बाजूला केले जाते. यामुळे चांगल्या लोकांची संधी जाते, म्हणून थेट जनतेतून निवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!