मावळमित्र न्यूज विशेष:
श्रीक्षेत्र देहू व श्रीक्षेत्र आळंदी सह तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणा-या आंद्रा धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. जोरदार पावसाने धरणाच्या पाणीसाठयात वाढ झाली असून सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे.
मावळकरांसह औद्योगिक क्षेत्र आणि देहू आळंदी तीर्थक्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. मागील आठवडाभर धरण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठयात मोठी वाढ झाली आहे .
धरण परिसरातील सर्व धबधबे ओसांडून वाहत असून ओढे नाल्यांना पूर आला आहे. धरण परिसरातील भात शेतीत पाणीच पाणी साठले आहे.
यंदाच्या हंगामात शंभर टक्के धरण भरलेले आंद्रा हे पहिले धरण ठरणार आहे. त्या पाठोपाठ वाडिवळेतून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अंद्रायणी आणि इंद्रायणी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठावर विनाकारण भटकू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!