पंढरपूर:
कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटलच्या वतीने आषाढी वारी निमित्त पंढरपुरातील वारकरी बांधवांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व महावीर हाॅस्पिटल सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांच्या पुढाकारातून मागील १६ वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे.
मागील दोन वर्षाचा कोरोना काळातील अपवाद वगळता मुथा हा उपक्रम राबवित आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांनी पंढरपुरात सावळ्या विठूरायाच्या दर्शनाला गर्दी केली होती. याच धर्तीवर महावीर हाॅस्पिटल व कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टने आरोग्य वारी घेऊन वारकरी बांधवांची सेवा केली.
चंद्रभागेच्या तीरावर,श्री संत पुंडलिकांच्या मंदीर समोर महावीर हाॅस्पिटलने आरोग्य कॅम्स लावला आहे. महावीर हाॅस्पिटलच्या रुग्णवाहिकेते सर्व प्रकारच्या औषधोपचाराची सोय केली होती.
एकादशीनिमित्त रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सूरू झालेली आरोग्य तपासणी सायंकाळपर्यंत चालूच होती.
या आरोग्य तपासणी शिबिरात महाराष्ट्रातील शेकडो भाविकांची तपासणी केली. या दरम्यान,या परिसरातील पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. यंदा मोठ्या प्रमाणावर वारकरी बांधव सहभागी झाल्याने,कुणा वारकरी बांधवाना चक्कर येणे,दम लागणे,धाप लागणे असे कित्येक प्रकार घडले. यावेळेस स्थानिक स्वयंसेवक या वारकरी बांधवाना तातडीने प्राथमिक उपचारासाठी महावीर हाॅस्पिटलच्या या शिबिरात दाखल करायचे.
महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा आणि महावीर हाॅस्पिटलची टीम तातडीने या रूग्णांवर उपचार करून औषधोपचार करीत होते. याशिवाय हात पाय दुखणे,थंडी,ताप,जुलाब,उलटी,चक्कर येणे अशा अनेक रूग्णांवर उपचार करण्यात आले.
वयोवृद्ध महिला व पुरुष वारकरी बांधवांच्या पायाला जखमी झाल्या होत्या त्यावर मलम पट्टी लावून हळूवार फुंकर मारण्याचे काम महावीर हाॅस्पिटलच्या टीमने केले. याशिवाय पायाला मलम लावून माॅलिश करून दिली. बी.पी.शुगर असलेल्या रूग्णांना स्लाईनचा डोस दिला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे.कांबेश्वर महादेव ट्रस्टच्या संस्थापिका कांचेनबेन कांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने हा उपक्रम घेतला जातो. डाॅ.विकेश मुथा यांच्या सह या आरोग्य वारीत शिवसेनेचे कामशेत शहराध्यक्ष गणेश भोकरे,गणेश घोगरे,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन सरचिटणीस रामदास वाडेकर,विद्या मालपुटे, सुरेखा खैरनार,गीतांजली वाघवले,प्रमोद पवार सहभागी झाले होते.
महावीर हाॅस्पिटलच्या वतीने ‘मावळ तालुका दिंडी समाजाच्या धर्मशाळेत मावळ तालुक्यातील वारकरी बांधवांवर औषोधपचार केले.

error: Content is protected !!