

इंदोरी :
कुंडमळा येथे पाण्यात बुडणाऱ्या युवकाला वन्यजीव रक्षक टीमच्या सदस्यांनी वाचवले. वन्यजीव रक्षक टीमच्या सदस्यांनी या तरूणाला जीवदान दिल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.रविवार ( दि . १० ) रोजी संस्थेच्या आपत्ती व्यवस्थापन टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली.
कुंडमाळा येथे रविवारमुळे पर्यटकांची खूप गर्दी होती . त्यामुळे या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी संस्थेची आपत्ती व्यवस्थापन टीम तैनात होती . याचवेळी एक व्यक्ती नदीपात्रात पडून वाहून जाऊ लागला होता . त्यावेळी या ठिकाणी कर्तव्यदक्ष असलेली वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या रेस्क्यू टीमने क्षणाचाही विलंब न लावता , नदीपात्रात उतरून बुडालेल्या व्यक्तीस पाण्याबाहेर काढले .
बुडालेल्या व्यक्तीच्या नाका – तोंडामध्ये पाणी गेल्यामुळे व्यक्ती मृत पावली की काय असे वाटत होते . असे असताना संस्थेतील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या सदस्यांनी परिस्थितीवर मात करत त्या व्यक्तीस सीपीआर देऊन तात्काळ प्राथमिक उपचार केले व जीवनदान दिले . हा सर्व प्रकार नदीपात्राच्या मधोमध घडला . बोटीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढण्यात आले . कारण पाण्याचा प्रवाह इतका होता , की त्या व्यक्तीला वाचवणे अशक्य होते . असे असताना देखील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि सर्व सदस्यांचे टीमचे नियोजन या जोरावर या युवकाला वाचवण्यास टीमला यश आले असून त्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले .
ही सदरची कामगिरी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे , अनिल आंद्रे , गणेश निसाळ , विनय सावंत , निनाद काकडे , विलास गायकवाड , श्रेयस कांबळे , विश्वजीत भोहीटे , भास्कर माळी यांच्या पथकाने केली . याप्रसंगी उपस्थित नागरिकांनी आपण सर्वांनी या सर्व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत . तसेच या टीममधील सदस्य कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता समाजासाठी केलेली निस्वार्थी सेवा या भावनेतून काम करतात . त्यामुळे त्यांचे कौतुक करावे थोडेच , अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या सभासदांचे स्नेहसंमेलन उत्साहात
- मोरया ढोल पथक व मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप


