पर्यटकांनो स्वतःला आवरा, जीव सावरा
अपघातांपासून सतर्क राहण्याची आवशक्यता
वडगाव मावळ :
दरवर्षी पावसाळ्यात लोणावळा,खंडाळयासह नाणे मावळ, आंदर मावळ, पवन मावळ भागात असंख्य पर्यटक फिरण्यासाठी व निसर्ग पाहण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. डोंगरावर सेल्फीच्या मोहापायी, दारूच्या नशेत डोंगरकड्यावर व धबधब्याखाली, दुचाक्या पळविण्याच्या नादात, पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्यावर दमछाक होऊन अनेकजण मृत्यूच्या दारात जातात. त्यासाठी मावळ तालुक्यात पर्यटनस्थळास भेट देणाऱ्या पर्यटकांना स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घेण्याची आवशक्यता आहे तसेच पोलीस प्रशासनानेही मस्तीखोर पर्यटकांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.
मावळ तालुका हा निसर्गसौंदर्यांना नटलेला तालुका असून पर्यटनाच्या दृष्टीने मोठा तालुका आहे. येथे लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, राजमाची, ढाक किल्ले तर बेडसे, भाजे, कार्ला ह्या लेण्या तसेच पवना, वडिवळे, भुशी, वलवण ह्या धरण भागात व सह्याद्रीच्या रांगेत धबधब्याखाली पर्यटक असंख्य पर्यटक भेट देत असतात. मात्र काही पर्यटक येथे दारूची नशा करून निसर्गाचा आनंद घेतात. धरणात उतरतात, धबधब्यांखाली जातात, सह्याद्रीच्या कडेकपारी भटकून दर्याखोऱ्यात पडतात आणि जीवाशी खेळतात.
सोमवार ता.27ला  दुचाकीवर पुण्याहून लोणावळ्यात फिरण्यासाठी आलेल्या कुटुंबाचा शिलाटणे गावाच्या हद्दीत जुन्या पूणे-मुंबई महामार्गावर कंटेनरच्या धडकेत अपघात झाला. ह्या अपघातात चूक कोणाची होती माहित नाही. पण हा अपघात एव्हडा भयंकर होता कि दुचाकीवर असलेल्या माय- लेकाचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील पुरुषाचा पाय तुटला व तो बचावला. हलक्या पावसाच्या सरीत कंटेनर तिघाजणांना चिरडून गेला. ह्या अपघातात महिला व तिच्या तीन वर्ष्याच्या मुलाच्या शरीराचा भुगा झाला होता. हा अपघात पाहण्याऱ्या नागरिकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. मायलेकाचे दोन मृतदेह उचलण्यासाठी नागरिकांना अक्षरशा लोखंडी खोऱ्याचा वापर करावा लागला. अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्यापासून पर्यटकांनी व नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन पर्यटणाचा आनंद घेणे खूप महत्वाचे आहे.

error: Content is protected !!