
लोणावळा:
पावसाचे आगर म्हणून ओळखल्या जाणा-या लोणावळ्यात धुवाधार पाऊस बरसतोय. आत्तापर्यंत लोणावळ्यात ९०७ मिलिमिटर पाऊस बरसला असून तीन दिवसांतच ४९२ मिलिमिटर पाऊस कोसळला आहे. मागील वर्षी ११३२ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली होती. यंदा उशीरा पाऊस सुरू झाला,पण पावसाच्या बॅटिगने पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे पडत आहे.
लोणावळा खंडाळा सह पवना,शिरोता,सोमवडी,ठोकळवाडी,वलवण,आंद्रा धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. धरणाच्या पाणीसाठयात वाढ होत असून ओढे नाले दुथडी भरून वाहत आहे. पावसाने बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामात बळीराजाची लगबग सुरू आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी ही चांगलाच सुखवला आहे. त्यांची रखडलेली भात लागवड आता जोमाने सुरु झाली आहे, सर्व शेतकऱ्यांचे पाय आता शेताकडे वळले आहेत.
खडकवासला धरण परिसरात १३ मिमी, पानशेत ६० मिमी, वरसगाव ५५ मिमी आणि टेमघरधरणाच्या पाणलोट क्षेत्रात ८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर या चार धरणांचा उपयुक्त पाणीसाठा सुमारे ५.४५ टीएमसी पर्यत पोहचला आहे.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन


