पुणे:
मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे.
नाशिक आणि चंद्रपूर या जिल्ह्यांनाही तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. तिथेही जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.
मुंबईसह कोकणात बुधवारी दुपारपासून पावसाने उसंत घेतली आहे. आजही दिवसभरात फक्त रिपरिप पाऊस होता. शुक्रवारी मात्र मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल असे पोषक वातावरण असल्याचे हवामान तज्ञांनी म्हटले आहे.
त्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकडय़ा (एनडीआरएफ) तैनात करण्यात आल्या आहेत.
धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्येही उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जालना, संभाजीनगर, बीड, नगर, धाराशीव, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत तुरळक किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याने दिलेल्या नकाशात दर्शवण्यात आले आहे.

error: Content is protected !!