कल्हाट:
अनाथ निराधार व गरजु मुलांसाठी ‘ एक हात मदतीचा’ हा उपक्रम हाती घेऊन गाव वाडी वस्तीवर तळागळात शेवटच्या घटका पर्यत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष श्री संदीप बबन कल्हाटकर पोहचत आहे. त्यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
गरजू विद्यार्थी शिक्षणापासून  वंचित रहात कामा नये. म्हणुन हा उपक्रम राबवला जात आहे.
   जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कुणे व जिल्हा परीषद प्राथमिक शाळा अनसुटे या दोन्ही गावातील शाळे मध्ये
हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष श्री संदीप बबन कल्हाटकर यांच्या   संकल्पनेतुन एक हात मदतीचा या उपक्रमाच्या  माध्येमातुन दफ्तर वाटप करण्यात आले.
या मुलांच्या चेहरावरील आनंद आसाच पुढे दिसन्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी  लागेल ती मदत नकीच या पुढे हि करु असे  आश्वासन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ अध्यक्ष श्री संदीप बबन कल्हाटकर यांनी दिले.
  उपसरपंच श्री अमोल अगिवले,पोलीस पाटील शिल्पा थरकुडे,क्रिडा आघाडी अध्यक्ष विनायक कल्हाटकर, सोशेल मिडिया मावळ अध्यक्ष मंगेश जाधव,
सरपंच सुदाम सुपे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काळुराम ठाकर, मुख्याध्यापक यादव सर, सूनयना देवर्षी,
अनसुटे शाळेच्या मुख्याध्यापक रूपाली इथापे, लोटे मॅडम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास टाकळकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ठाकर व पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!