मावळमित्र न्यूज विशेष:
हाडांच्या मजबुतीसाठी आहारात हिरव्या पालेभाज्या  समाविष्ट करा असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी केले आहे.
कॅल्शियममुळे हाडांच्या मजबुतीसाठी बळ मिळते. हे कॅल्शियम दातांसाठी आणि स्नायूंसाठी देखील लाभदायक आहे. सामान्यतः असे मानले जाते की दूध हे कॅल्शियमचे एकमेव समृद्ध स्रोत आहे.
हे महत्त्वाचे पोषक तत्व आपल्याला माहिती आहे,या  पुढे जाऊन अन्य काही  पदार्थांद्वारे देखील  कॅल्शियम मिळू शकते,याकडे डाॅ.विकेश मुथा यांनी लक्ष वेधले.
गडद हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी खूप हितकारक असल्याचे अधोरेखित करीत डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” सामान्यतः आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी पालक सारख्या हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.मावळ प्रांतात अनेक रानभाज्या आहेत  ज्याचा आपल्याला नियमित आहारात वापर करता येईल.
हाडे आणि स्नायूंच्या बळकटीसाठी तुम्ही सलगमची पानेदेखील वापरू शकता.
कॅल्शियमने फक्त हाडे मजबूत करत नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते.नट्स आणि सीड्स हे सुपर रिच कॅल्शियम पदार्थ मानले जातात. रोजच्या आहारात बदाम, चिया सीड्स, सूर्यफूल बिया, खसखस यासारख्या गोष्टींचा समावेश करता येईल.
कडधान्याची भाजी तर प्रत्येक घरी  बनते. मावळात असे एक ही  घर नसेल जिथे ही भाजी बनत नाही.ती कॅल्शियमचा सोपा आणि स्वस्त स्रोत आहे. चांगले आरोग्य राहण्यासाठी बिन्स कमी तेलात शिजवावे असा सल्ला ही मुथा यांनी दिला.

error: Content is protected !!