पुणे :
जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या आगामी निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. १३ जुलै रोजी ही आरक्षण निघणार असून तसा आदेश नुकताच निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत.
राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांमधील आरक्षण सोडत ७ जुलै ते २ ऑगस्ट या दरम्यान होणार असून राज्य निवडणूक आयोगाने आज आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार ७ जुलै रोजी आरक्षण सोडतीची सूचना वर्तमान पत्रात प्रसिद्ध करायची असून १३ जुलै रोजी सर्व संवर्गाच्या महिलांचे आरक्षण सोडत घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांच्याकरिता आरक्षित जागा निश्चित करण्याकरिता सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात यावा असे आदेशात नमूद केले आहे.
दरम्यान १० मे, २०२२ रोजीच्या आदेशान्वये २५ जिल्हा परिषदांमधील सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत २८४ पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सदर कार्यक्रमानुसार २७ जून २०२२ रोजी अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे.

error: Content is protected !!