वडगाव मावळ:
आंदर मावळात वर्षाविहाराला येणा-या  पर्यटकांकडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने पुरेशा उपाय योजना कराव्यात अशी मागणी मावळ तालुका शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे  तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी पोलीस निरीक्षक मावळ विलास  भोसले यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे. भोसले यांना दिलेल्या निवेदनात खांडभोर म्हणाले,”आंदर मावळ मध्ये टाटा धरणाचा जलाशय  व छोटे मोठे धबधबेचा आनंद घेण्यासाठी, निसर्ग न्याहाळत हजारो पर्यटक आंदर मावळात येत आहे.
कोरोनात दोन वर्ष पर्यटकांवर बंदी होती. परिणामी पर्यटकांचा ओढा  या भागात कमी होता. या वर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येण्याचिं शक्यता नाकारता येणार नाही.पर्यटक चे आकर्षण माऊ जगताप वॉटर फॉल ,गभाले व मोरमारेवाडी धबधबा वडेश्वर टाटा धरण भाग व वडेश्वर धबधबे वडेश्वर(शिंदेघाटेवाडी ) शिव मंदीर, खांडीचा 18नंबर पॉईंट वरसुबाई मंदीर या व इतर ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात .
त्यामुळे  माऊ व वडेश्वर व डाहूली या ठिकाणी खूपच ट्रेफिकजाम  होत असते तरी आपण या बाबत
फळंणे फाटा येते आपल्या चौकी मार्फत मद्यधुंद पर्यटन मूळ स्थानिक नागरिकांस व इतर निसर्ग चा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्रास होऊ म्हूणूण चेक पोस्ट त्वरित सुरू करावा.
तसेच   सदर चे रस्ते छोटे आहे त्या मूळ कोना स्थानिक  नागरिकांस शेतकरी शाळकरी कामगार वर्ग स वेळे वर जाणे येणे बाबत त्रास होऊ नये या बाबत आपण सदर ट्राफिक जाम होते तिथ वाहतूक सुरळीत करणे कामी आपले आधीकारी नेमावे जेणे करून ट्राफिक जाम होणार  नाही.

error: Content is protected !!