आकुर्डी :
मानव विकास परिषद संस्थेच्या हवेली तालुका कार्याध्यक्ष पदी  अनिता शैलेश  सैद यांची  निवड करण्यात आली आहे.
मानव विकास परिषदचे अफसर शेख संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या आदेशाने ही निवड करण्यात आली.
राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक चौधरी , राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब लोंढे,व प्रदेशाध्यक्ष बळवंत मनवर , प्रदेश सचिव डॉ सचिन सूर्यवंशी व असलम सय्यद प्रदेश कार्याध्यक्ष ,अंकुर कदम युवा प्रदेशाध्यक्ष , जयश्री अहिरे महिला प्रदेश अध्यक्ष यांच्या संमतीने अन्सार शेख राष्ट्रीय संपर्कप्रमुख तसेच संस्थेचे खजिनदार अलीम सय्यद यांच्या सहमतीने ही निवड करण्यात आली आहे.
मानव विकास परिषद संस्थेची अनेक वैशिष्ट्ये आहेत.मानव विकास परिषद म्हणजे शोषित, श्रमिक, पोलिस कोठडीत मृत्यु, बेकायदेशीर अटक, शोषण, गुलामगिरी, दहशत, मागसवर्गीयांवर होणारा अन्याय त्याचप्रमाणे सरकारी कार्यालयाकडून होणारी पिळवणूक, मानवी हक्कांचे उलंघन, शासकीय अधिकाराचा गैरवापर, भांडवल शाहीकडुन पैशाच्या व सत्तेच्या जोरावर शासकीय यंत्रणेला स्वार्थासाठी होणारा वापर हे सर्व समुळनाश करण्यासाठी तसेच सर्व सामान्यांचे संविधानिक मानवी हक्कांसाठी प्रयत्नशील असलेली ही संस्था
आहे.
सामान्य जनतेला न्याय अधिकार मिळवून देणारा बुलंद आवाज अशी या संस्थेची ओळख आहे. सामाजिक बांधिलकी, निस्वार्थ वृत्ती आणि प्रामाणिकपणा यामुळे मानव विकास परिषदला जनतेकडुन प्रचंड समर्थन मिळत आहे या महान कार्यात आपणास सहभागी करण्यास आम्हास अत्यानंद होत असून आपली हवेली तालुका कार्याध्यक्ष पदावर
नियुक्ती करण्यात येत आहे असे सैद यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. अनिता सैद या हींलिंग हॅन्डस फाउंडेशन या संस्थेचे शिबीर व्यवस्थापक म्हणून काम पहात आहेत गरजू लोकांसाठी मोफत मूळव्याध ,बद्धकोष्ठता, हर्निया या आजारावर तपासणी आणि मार्गदर्शन कार्यक्रम घेण्याचे काम या पाहतात.सुगंता भगत यांनी मानव विकास परिषद मध्ये यांची शिफारस केली.

error: Content is protected !!