कामशेत येथील युवकावर तलवारीने वार करून दिले दरीत फेकून
वडगाव मावळ :
अनैतिक संबंधाच्या संशयावरून कामशेत येथील एकाचे अपहरण करून तलवार व दगड लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला हा प्रकार मावळ ते मुळशी हद्दीत बुधवार (दि २९) ते गुरूवार (दि ३०) घडला.
प्रशांत शांताराम भेगडे (वय २९ रा इंद्रायणी कॉलनी कुसगाव रोड कामशेत ता मावळ जि. पुणे) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या पतीसह नाने गावातील चौघांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या महितीनुसार प्रशांत भेगडे यांचे नाणे गावातील एका युवकाच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचा त्यास संशय होता. यामुळे त्याने व त्याचे ४ साथीदारांनी संगनमताने भेगडे यांना जेजुरीचे भाडे आहे. ते ठरवायचे आहे असे खोटे सांगुन भेगडे यांस कान्हे ते टाकवे बुद्रुक रोड वरील जांभुळ फाटा येथे बोलावून घेऊन भेगडे यांचा खून करण्याच्या उद्देशाने एका कार मधून अपहारण करून भेगडे यांना कुसुगाव प. मा. येथील एका डोंगरावर नेऊन भेगडे यांची कपडे काढून त्याचे पायावर, पाठीवर, छातीवर दगडाने मारहाण करून पोटामध्ये लाथा मारून व तलवारीने डोक्यात डावे बाजुस वार करून भेगडे यांना गंभीर दुखापत केली.
तसेच मारहाणी दरम्यान भेगडे मयत झाला आहे असे समजुन त्यास ताम्हनी घाट (ता. मुळशी जि. पुणे) येथील खोल दरीत टाकून देण्यासाठी कारमधून घेऊन जाऊन पिपंरी (ता. मुळशी जि. पुणे) येथील एका खोल दरीत टाकून देण्याचा प्रयत्न करून फिर्यादी भेगडे याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भेगडे यांच्यावर सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहे.याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून याबाबत पुढील तपास वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास सस्ते करत आहे.

error: Content is protected !!