वन महोत्सव 2022 अंतर्गत चिंबळी येथे वृक्षलागवड
संस्कार प्रतिष्ठानचा सहभाग
चिंबळी :
दरवर्षी 1 जुलै हा दिवस कृषि दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी सर्वसाधारण पणे महाराष्ट्र भर पाऊस पडतो. त्यामुळे 1 जुलै पासुन वनमहोत्सव कालावधी सुरु होतो. शहराजवळील लोकांना लोप पावत चाललेल्या वन औषधांचे महत्व कळावे व वनऔषधाची उपलब्धता व्हावी. शहराजवळील प्रदुषण कमी व्हावे तसेच उजाड पडलेले डोंगर हिरवेगार करणे. जमीनीची धूप कमी करणे, जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढविणे.
अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग व इतर संस्था, कंपनी, एनजीओ. यांच्या संयुक्त विद्यमाने मा.अमोल सातपुते, उपवनसंरक्षक जुन्नर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. योगश एस. महाजन. वनपरिक्षेत्र अधिकारी चाकण यांचे नियोजनातुन श्री.सचिन.यु.जाधवर, वनपाल आळंदी, कु. रेश्मा एम. गायकवाड वनरक्षक चऱ्होली खु. यांचे देखरेखेखाली मौजे चिंबळी येथील वनक्षेत्रात त्रिफळा (आवळा, हिरडा, बेहडा) औषधी रोपवन अंतर्गत 2 हेक्टर क्षेत्रावर  2022 चा पावसाळ्या अंतर्गत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये एकूण २२२२ झाडाचे वृक्षारोपण केले.  कृषी उत्पन्न बाजारसमिती खेड चे माजी सभापती श्री.विलासशेठ कातोरे यांचे हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रमाचे  उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी वृक्ष लागवड पूर्ण झाल्यावर रोप वनाचे संरक्षण संगोपन व देखभालीसाठी ग्रामपंचायत चिंबळी सहकार्य करणार असल्याचे व झाडांचे अच्छादन वाढण्यासाठी लोकांनी शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करावी असे मत माजी सभापती यांनी व्यक्त केले.
  वृक्ष लागवड कार्यक्रमास Fujistu Consulting India pvt ltd कंपनीचे श्री.सुनिल भालेराव, admin manager व इतर सदस्य. Raymond India Pvt Ltd कंपनीचे श्री. मनिष पधारीया व रंजना गायकवाड व इतर सदस्य. चाकण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संपत केदारे, सचिव – डॉ अमोल बेनके व इतर सदस्य, वसुंधरा बहुद्देशिय संस्थेचे श्री. अतुल सवाखंडे, संस्कार प्रतिष्ठान म.राज्य अध्यक्ष  डॉ मोहन गायकवाड,  Stanley Black & Decker India Pvt. Ltd  कंपनीचे डायरेक्टर श्री.सुनिल कृष्णमुर्ती व प्रज्ञा काटकर व इतर सदस्य, बालकलाकार आर्या घारे,सायली सुर्वे आदित्य चव्हाण,मृणाल सुर्वे,निशिता सुर्वे व इतर वन अधिकारी, कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!