मावळमित्र न्यूज विशेष:
डाॅक्टर डे निमित्त कामशेत येथील महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा व डाॅ.जाधव यांचे पुष्पगुच्छ देऊन आदर करण्यात आला. देशभर डाॅक्टर डे साजरा करताना डाॅक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस या दिवसाचे औचित्य साधून महावीर हाॅस्पिटल च्या डाॅक्टरांना पुष्पगुच्छ दिल्या.
कोलकाता मधील सन्मानित चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांचा जन्म (1882) आणि निधन (1962) मध्ये 1 जुलै रोजीच झाले होते. त्यामुळे त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांचे योगदान सध्याच्या परिस्थितीत फार मोठे आहे. तर काही ठिकाणी डॉक्टरांकडून फ्री मेडिकल कॅम्प भरवले जातात. जेणेकरुन एखाद्या आजारबद्दल त्यांना मोफत उपचारासह जनजागृती डॉक्टरांकडून केली जाते. त्यामुळे या दिवशी  डॉक्टरांना एखादे फुल, फुलांचा बुके किंवा शुभेच्छापत्रक देत त्यांचे आभार मानता येईल.
अशा प्रकारची अटकळ बांधली जाते. याच अनुषंगाने महावीर हाॅस्पिटल मध्ये डाॅक्टर दिन  साजरा  झाला. त्याच प्रमाणे महावीर हाॅस्पिटल संचलित निगडी येथील रेडीयंट सेंटर येथेही डाॅक्टर दिन साजरा झाला. यावेळेस दोन्ही युनिट मधील स्टाफ उपस्थित होता. ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा, कांतीलाल मुथा यांनी डाॅक्टर डे निमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.
1882 मध्ये पटना बंगाल प्रेसीडेंट, ब्रिटिश भारतात जन्मलेल्या डॉ. बिधान चंद्र रॉय चिकित्सक, एक स्वातंत्र्य सेनानी, एक शिक्षण विद्ववते आणि एक राजनीतिज्ञ होते. देशाच्या प्रति त्यांचे समर्णण आणि सेवाभाव पाहता 1991 मध्ये डॉक्टर्स डे साजरा करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डॉ. बिधान चंद्र रॉय यांनी 1948 ते 1962 दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळली. काउंसिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशन प्रत्येक 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतात.

error: Content is protected !!