
महिंद्रा कंपनी परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे आंदर मावळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी
कान्हे मावळ:
आंदर मावळ मधील महिंद्रा कंपनीच्या परिसरात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. कान्हे रेल्वे गेट ते आंदर मावळ दिशेने गेलेल्या रस्त्यावर बराच वेळा ‘चक्का जाम’ होण्याच्या घटना नेहमी घडत आहे .हे यावर थांबत नाही,येथून प्रवास करणारे दुचाकीस्वार जीव मुठीत धरून प्रवास करीत आहे.अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या अवजड माल वाहतूक वाहनांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाहीत.
कान्हे रेल्वे गेट ते महिंद्रा कंपनी पर्यंत दोन्ही बाजूने वाहने अडकून अनेक वेळा अडकून राहात आहे . मंहिंद्रा कंपनी परिसरात या रस्त्यावर वाहने बेशिस्तपणे उभी करून ठेवण्यात येत आसल्यामुळे ही समस्या नित्याचीच होत चालली आहे .
कान्हे रेल्वे गेट ते महिंद्रा कंपनी पर्यंतच्या रस्त्यावर हे प्रकार वाढत असतात. महिंद्रा कंपनी च्या मालवाहतूकिच्या गाड्या रस्तावर वर दोन दोन दिवस पार्किंग करतात त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते. महिंद्रा कंपनीत माल वाहतूक वाहने या रस्त्यावर उभी करण्यात येतात. त्यातच काहीजण आपली वाहने मिळेल तशी बेशिस्तपणे उभी करून ठेवतात.
शिवसेना मावळ अध्यक्ष राजू खांडभोर म्हणाले,”आंदर मावळ मध्ये महिंद्रा कंपनी च्या मालवाहतूकी च्या गाड्या रस्तावर वर दोन दोन दिवस पार्किंग करतात त्या मूळे खूपच वाहतूक कोंडी होते कंपनी ने वेळीच त्यांच्या माल वाहतूक गाड्या व्यवस्थित रित्या पार्किंग कराव्या शाळकरी विद्यार्थी, दुग्ध व्यवसाय, कामगार, पर्यटक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर कंपनीने या गोष्टीकडे दखल दिले नाही तर अन्यथा तीव्र आंदोलन कंपनी वर करण्यात येईल असा इशारा यावेळी खांडभोर व शिवसेना कार्यकर्ते यांनी दिला आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे




