गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
देवपाडा (जि.रायगड):
रायगड जि.प.शाळा देवपाडा ता कर्जत जि रायगड तेथी इ १ ली ते इ ८ पर्यंतच्या १५६ विद्यार्थ्यांना पाटी,पेन्सिल,वेगवेगळ्या प्रकारच्या वह्या,पुस्तके,पेन,खोडरबर,शिस पेन्सिल,ड्राईंग पेपर,डिझाईनचे पेपर,रंगपेटी,ड्राईंग शिट्स,वह्यांचे कव्हर,पट्टी इ.साहित्य पिंपरी चिंचवड मनपा शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री प्रभाकर मेरुकर सर व सेवा निवृत्त शिक्षिका सौ रंजना गोराणे यांच्या हस्ते वाटप केले.
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले जाते.हि शाळा आदिवासी भागातील असुन विद्यार्थ्यांचे आई वडील मोलमजूरी करुन आपल्या मुला शिकवत असतात.याचा संस्थेच्या वतीने दरवर्षी एप्रिल महिन्यात सर्वे केला जातो.यावर्षी मे महिन्यातच वह्यांपुस्तके जमा करण्यात आले.यामध्ये ब-याच दानशुर व्यक्तींनी मदत केली,अगदी बाहेरच्या जिल्ह्यातील मदत आली.
याचे संयोजन डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सचिव भरत शिंदे,दत्तात्रय देवकर,अनुषा पै,अनुराधा शिंदे,विद्या भागवत,मिनाक्षी मेरुकर,मनोहर कड, पल्लवी नायक,रुपाली नामदे,सुभाष चव्हाण,डॉ डी वाय पाटील फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोहन चितलांगे सर सौ सुनिता गायकवाड यांनी केले होते.जि.प.शाळा देवपाडा चे मुख्याध्यापक रोहिदास आडे , शिक्षक संजय पंडीत,दिलीप गोतारणे ,चन्नम्मा सगणे आणि पालक उपस्थित होते.

error: Content is protected !!