बेलज:
आंदर मावळ मधील बेलज येथे मदुरा मायक्रोफायनान्स लिमिटेड’ आणि ‘क्रेडिटऍक्सेस इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक विकास उपक्रमाअंतर्गत अंगणवाड्यांसाठी आवश्यक साहित्य वितरण करण्यात आले.
बेलज येथील एक अंगणवाड्यांसह महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील अन्य ३० अंगणवाड्यांमध्ये हा उपक्रम राबवणायत आला.
या विकास उपक्रमासाठी शाखा कार्यक्षेत्रातील योग्य अंगणवाड्या निवडल्या गेल्या ज्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीला उत्कृष्ठ अशा २० लहान खूर्च्या,४ मोठ्या खुर्च्या आणि २ सतरंज्या या ठिकाणी हस्तांतरित करून आधार देण्याचा प्रयन्त केला आहे.
अंगणवाडी हा भारत सरकारच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेला सरकार पुरस्कृत बालसंगोपन आणि माता काळजी विकास कार्यक्रम आहे.
RBI मान्यताप्राप्त मदुरा कं.  ग्रामीण, शहरी व निमशहरी भागातील मध्यम व गरजू महिलांच्या व्यावसायिक व आर्थिक वृद्धीसाठी उत्तम सेवा देण्याकरिता कायमच प्रयत्नशील राहिली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी अंतर्गत यापूर्वीही रक्तदान शिबीर, पोलीस प्रशासनाचा सन्मान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, पूरग्रस्त मदत असे विविध उपक्रम यशवीरित्या राबविले आहेत.
मदुरा ची स्थापना २००६ मध्ये झाली असून सध्या महाराष्ट्रासह आणखी ६ राज्यांमध्ये कार्यरत आहे. मदुराचा प्रमुख उद्देश हा ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या  महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय वाढीसाठी तसेच नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून खेळत्या भांडवलाची
आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अर्थसाह्य  करते किमान व्याजदर विविध कर्ज प्रकार, जलद कार्यवाही, सुलभ सेवा, पारदर्शक व्यवहार,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हि मदुराची खास वैशिष्ठे आहेत.
या कार्यक्रमास मदुराचे विभाग प्रमुख तसेच मंदुराचे शाखाधिकारी तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षिका, सहायिका, अंगणवाडी सुपरवायझर, CDPO अधिकारी, सरपंच आणि बचत गटातील सभासद हे उपस्थित होते.
CDPO मा.श्री विशाल कोटागडे , अंगणवाडी सुपरवायझर , जुलेखा शेख,जि.प. मुख्यध्यापक बांबळे ,  श्री शिवदे सर अंगणवाडी सेविका रत्नप्रभा मदगे, अंगणवाडी मदत‌निस  संगिता वाजे ,विभाग टाकवे, अंगणवाडी केंद्र बेलज,मदुरा मायक्रो  फायनान्सचे विभाग प्रमुख दत्ता रुमाले , शाखा प्रमुख रविंद्र भोसले , केंद्र मैनेजर अजय मरार, केंद्र मैनेजर केतन पारखे उपस्थित होते.

error: Content is protected !!