
वडगाव मावळ:
अनाथ निराधार व गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. संदिप बबन कल्हाटकर अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
गरजु विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला पोलिस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य व हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाने पदाधिकारी व श्री बळीराम भोईरकर-सरपंच भोयरे,श्री राजाराम करवंदे- उपाध्यक्ष शा.व्य. समिती भोयरे,श्री.रामचंद्र विरणक- मुख्याध्यापक,श्री.तानाजी शिंदे सर,सौ.शांता विरणक ,सौ.अर्चना गाढवे,श्रीम.संध्या नवथळे ,श्री मारुती खुरसले सर,श्री बाळासाहेब थरकुडे सर
श्री अमोलशेठ अगिवाले उपसरपंच,सचिन पालवे, रूपेश कल्हाटकर,ऋषीकेश कार्ले,विशाल जाधव
सचिन शिंदे,विशाल कल्हाटकर,प्रतिक अगिवले उपस्थित होते.
तानाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. रामचंद्र विरणक यांनी आभार मानले.
गरीब व गरजूंनी अधिक माहितीसाठी:९५९४४६४१६२ / ९७६३८७६००७ संपर्क साधावा ,असे आवाहन हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप कल्हाटकर यांनी केले.
- अनसुटेत विद्यार्थांना खाऊ वाटप:संतोष मोधळे मित्र मंडळाचा उपक्रम
- निर्भीड, निष्पक्ष विचारांचा अजोड योध्दा-सुदामराव वाडेकर
- मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी वतीने “तिरंगा रॅली” मधे युवकांचा उस्फुर्त सहभाग
- शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
- वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने जल समाधी अंदोलन


