
माऊ (ता.मावळ):
श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल टाकवे येथील २००२-२००३ बॅचेचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी २० वर्षानी एकत्र भेटले. निमित्त होते,विद्यार्थी स्नेह संमेलन व शिक्षक सन्मान सोहळा याचे. आंदर मावळातील जगताप वॉटर फॉल येथे आयोजीत केला या कार्यक्रमामुळे शालेय जीवनातील आठवणीने व वीस वर्षानंतर एकमेकांच्या भेटीने सर्वांचीच मने आनंदित झाली.
कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलन व शिवरायांच्या प्रतिमेस उपस्थित शिक्षकांच्या हस्ते पुष्प हार घालून झाली. त्या नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत चंद्रकांत शिंदे यांनी केले. कोरोना काळात ज्या सहकार्याचे निधन झाले ते कै. दशरथ असवले व रेल्वे अपघातात निधन झालेले कै. काळूराम वाघमारे यांना उपस्थितांच्या वतीने श्रध्दांजली समर्पित करण्यात आली. त्या नंतर उपस्थित शिक्षकांचा विद्यार्थ्याच्या वतीने सन्मान करण्यात आला.
उपस्थित विद्यार्थ्याची ओळख व शालेय जीवनातील आठवणी किस्से सर्वाना सोबत सांगण्यात आले. शिक्षकांचे मनोगत झाले उपस्थित शिक्षकामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या स्वाती मांडलिक , अंजली जाधव तर न्यु इंग्लिश स्कूल चे दहावी चे वर्ग शिक्षक श्री माणिक जाधव, श्री पीराजी वारिंगे, श्री नारायण असवले व श्री रोहन पंडित उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मुलींची उपस्थित होती.
१५० किलोमीटर सासर हून प्रवास करून काही मुली या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या बद्दल शिक्षकांनी त्यांचे विशेष कौतुक केले.असे उपक्रम घेतल्याने लहानपणाची असणारी मैत्री च्या आठवणीना नक्कीच उजाळा मिळेल व आत्ताच्या असणाऱ्या धक्काधकीच्या आयुष्यात सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होता येईल अशी भावना अनेक जणांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत लंके यांनी केल तर आभार प्रदर्शन गोकुळ लोंढे यांनीकेले.
कार्यक्रमाची पूर्वतयारी व विद्यार्थी जमविण्याचे काम योगेश गुलाब शिंदे ,दीपक शिंदे ,दिनेश लंके, संदीप काटकर ,सीमा असवले व अर्चना लष्करी यांनी केल या कार्यक्रमानिमित्त लक्ष्मण गरुड, विनोद मालपोटे ,गौरी जांभुळकर ,निलम लोंढे,रमेश पिंगळे,योगेश करवंदे,श्रीकांत मोढवे, सज्जन मालपोटे,सुवर्णा असवले,कविता असवले, संदिप शिंदे,मारुती काटकर, सोमनाथ लंके,सिताराम काटकर ,ज्ञानेश्वर लंके,श्रीपत शिंदे,गणेश चोरघे,श्रीकांत बढे,गोविंद कुंभार,चित्रा शिंदे,अर्चना मालपोटे,वैशाली असवले,अंजना शिंदे,जनता पवळे,मेघना मदगे,
सोमनाथ मोरे,सुधीर कचरे ,रेवन खरमारे ,शकुंतला धामणकर,लहू गाडे, निवृत्ती चव्हाण,तानाजी धामणकर, स्वाती मोढवे, नंदा खरमारे व उषा खरमारे उपस्थित होते.
- शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
- वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने जल समाधी अंदोलन
- गावपातळीवरील विकासाची दूरदृष्टी असलेला सहकारी हरपला: सरपंच नामदेवराव शेलार
- शिवसेनेच्या वतीने तळेगावात निषेध सभेचे आयोजन
- संस्कार प्रतिष्ठानचे रक्षाबंधन भारतीय सैनिकांसोबत


