पॉस्को कंपनीच्या वतीने, नवलाख उंब्रे येथे वृक्षारोपण
नवलाखउंब्रे :
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे.येत्या काळात नवलाखउंब्रे परिसरात फळझाडे, फुलझाडे , वनौषधी रोपे लावून वृक्षसंवर्धन चळवळ उभी केली जाणार आहे,या चळवळीत सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन नवलाखउंब्रे ग्रामपंचायतींच्या सरपंच सविता बधाले यांनी केले.
येथील पॉस्को इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ग्रामपंचायत नवलाख उंब्रे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री राम मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.याचे औचित्य साधून सरपंच बधाले यांनी नवलाखउंब्रेत राबविण्यात येणा-या वृक्षसंवर्धन चळवळीची माहिती दिली.
पॉस्को आय. पी. पी. सी. चे डायरेक्टर एस. एच. किम, सरपंच सविता बधाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या पर्यावरण पूरक उपक्रमात विविध जातीच्या शेकडो वृक्षाचे रोपण करण्यात आले.
योग्य अंतर ठेऊन, खड्डे घेऊन, लाल मातीचा वापर करून वृक्षारोपण करण्यात आले. संरक्षक पिंजरे लावण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे स्टाफ मॅनेजमेंट पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.या उपक्रमाचे गावात कौतुक होत आहे.
नवलाखउंब्रे च्या सरपंच पदाची सुत्रे हाती घेतलेल्या सरपंच सविता बधाले यांनी आगामी काळात राबवण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती देताना वृक्षसंवर्धनाला झुकते माप दिले. येत्या काही दिवसात ओसाड माळरानावर,शाळा, डोंगर, शाळा परिसरात वृक्षारोपण करण्याचे सुतोवाच केले.

error: Content is protected !!