साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
वडगाव मावळ :
जवळील साते गावाजवळ असणाऱ्या सेफ एक्सप्रेस नावाच्या कंपनीत एक भेकर घुसले. वन्यजीवरक्षक टीम व वनविभागाच्या मदतीने त्या भेकरास सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आले आहे.
साते हद्दीतील पुणे – मुंबई जुन्या महामार्गाशेजारील सेफ एक्सप्रेस नावाच्या कंपनीत सकाळी आठच्या सुमारास एक नर जातीचे भेकर घुसले. येथील कर्मचारी दत्ता माकर यांनी याबद्दल वन्यजीवरक्षक टीमचे सदस्य मिथुन गाभने यांना याबाबत माहिती दिली व भेकरास सुरक्षितपणे पकडून ठेवले. वन्यजीवरक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे व अध्यक्ष अनिल आंद्रे, सदस्य जिगर सोळंकी, निनाद काकडे, दक्ष काटकर, सचिन वाडेकर व वनविभागाचे वनरक्षक संदीप जांभूळकर, आशा शेळके, मोहिनी शिरसाट आणि शिवाजी बुंदे यांनी तळेगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात भेकराची प्राथमिक तपासणी व प्रथमोपचार करून साते शेजारील वनक्षेत्रात सोडून दिले, अशी माहीती निलेश गराडे यांनी दिली.

error: Content is protected !!