
टाकवे बुद्रुक ला भैरवनाथ मंदिर येथे योग शिबिरास सुरवात
टाकवे बुद्रुक:
योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते.
मुळची भारत देशाची योग शिक्षण प्रणाली आज जवळजवळ १६३ देशात पोहचली आहे, जगाने योगाचे महत्त्व मान्य केले आहे. आणि आपणच त्याकडे दुर्लक्ष करतो आहे.. दिवसभरात २४ तासांपैकी किमान अर्धा तास तरी स्वतच्या आरोग्याकरीता दिला पाहिजे म्हणुनच या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात योगप्रशिक्षक कुलकर्णी सर, संतोष जांभूळकर, विश्वकर्मा यांनी योगाभ्यासाबद्दल मार्गदर्शन केले. निरोगी जीवनाची गुरकिल्ली असलेल्या योगसाधनेचा दैनंदिन जीवनात उपयोग आणि महत्व त्यांनी विशद केले. तरी गावातील ग्रामस्थांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, माता- भगिनींनी विनंती आहे आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा वयाची मर्यादा नाही व हे प्रशिक्षण मोफत राहील.
- अनसुटेत विद्यार्थांना खाऊ वाटप:संतोष मोधळे मित्र मंडळाचा उपक्रम
- निर्भीड, निष्पक्ष विचारांचा अजोड योध्दा-सुदामराव वाडेकर
- मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा व विद्यार्थी आघाडी वतीने “तिरंगा रॅली” मधे युवकांचा उस्फुर्त सहभाग
- शिवणे विकास सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी सुनिल ढोरे, रामदास टिळे यांची बिनिरोध निवड
- वाडिवळे रेल्वे गेट क्रमांक ४२ भुयारी मार्ग हटाव कृती समितीच्या वतीने जल समाधी अंदोलन


