कामशेत::
कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हाॅस्पिटल यांच्या वतीने
श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथून पंढरपूर कडे आषाढी वारी पालखी सोहळा  तील  श्री.संत भगवान बाबा ज्ञानेश्वरी प्रासादिक दिंडी साठी मोफत पाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली
कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टच्या संस्थापिका कांचेनबेन मुथा व
महावीर हॉस्पिटलचे  सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांच्या वतीने मागील १९  वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंजना  मुथा, ज्ञानेश्वरी निरूपण सोहळा समितीचे अध्यक्ष राजू असवले,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गणेश भोकरे, बाळासाहेब गायकवाड, विदेश देसाई,कैलास परमार,श्वेता खंडाते,गीतांजली वाघवले,प्रमिला आडकर उपस्थितीत होते.
  पंढरपूर कडे  जाणा-या  या टँकरचा  कामशेत येथे पूजन करण्यात आले. सासवड पासून  पुढे पंढरपूर पर्यंत मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. डाॅ.विकेश मुथा म्हणाले,” मागील १३ वर्षापासून पंढरीचा पांडूरंग ही सेवा करून घेत आहे. वारकऱ्यांच्या सेवेचे ही पुण्य वर्षभराचे टाॅनिक आहे. ही सेवा अशीच निरंतर घडत रहो ही माऊली चरणी प्रार्थना.या शिवाय महावीर हाॅस्पिटल आरोग्य वारी करणार असून दिंडी सोहळ्यातील भाविकांची सेवा करणार आहोत.

error: Content is protected !!