
वडेश्वर:
वडेश्वर येथील शिंदेघाटेवाडीतील ज्येष्ठ नागरिक व तरूणांनी शीतल वैकुंठधाम उपक्रम राबविण्यावर भर दिला आहे.लोकवर्गणी व श्रमदानातून या मंडळींनी स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण केले आहे.
यासाठी त्यांनी देशी रोपांना प्राधान्य दिले आहे. पिंपळ, वड, कडुलिंब अशी वेगवेगळी रोपे लावून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
ग्रामपंचायत सदस्य शिवराम शिंदे,व्हाईस चेअरमन मारुती शिंदे ,ज्येष्ठ कारभारी विलास खांडभोर ज्येष्ठ शिवसैनिक बबन भुरक यांच्या पुढाकारातून व शिंदेघाटेवाडीतील युवक आर्यन खांडभोर , दर्शन शिंदे, ओंकार आरडे, अभिजित शिंदे,ज्ञानेश्वर कांबळे, सुजल पाटोळे, नागेश केदारी या तरूणांनी यासाठी पुढाकार घेतला.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर म्हणाले,” ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तरूण पिढीने घेतला हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाचे गावोगावी अनुकरण झाले पाहिजे.निसर्ग संपन्न आंदर मावळात स्मशानभूमीचा परिसर ओसाड आहे.शीतल वैकुंठभूमी उपक्रम सुरू करून वृक्षारोपण चळवळीस गती येईल.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


