
चिखलसे:
श्री.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथून पंढरपूर कडे आषाढी वारी पालखी सोहळा दिंडी क्र .११४ साठी मोफत पाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कै कृष्णाजी काजळे प्रतिष्ठान मावळ, मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश वसंतराव काजळे. यांच्या वतीने मागील १३ वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पंढरपूर कडे जाणा-या या टँकरचा कामशेत येथे पूजन करण्यात आले. सासवड पासून पुढे पंढरपूर पर्यंत मोफत पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव कोढरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव टाकवे,माऊली जाभुळकर,मधुकर वाघुले,गायाखे महाराज,बाळासाहेब काळे,चंद्रकांत दोडे,वसंतराव काजळे, पारसमल परमार,दिनेश गायकवाड,मनोज भुल,महादेव कांबळे उपस्थित होते.
मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे म्हणाले,” मागील १३ वर्षापासून पंढरीचा पांडूरंग ही सेवा करून घेत आहे. वारकऱ्यांच्या सेवेचे ही पुण्य वर्षभराचे टाॅनिक आहे. ही सेवा अशीच निरंतर घडत रहो ही माऊली चरणी प्रार्थना.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


