मावळातील १० शाळांना २५ लाख रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध.
वडगाव मावळ :
आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून क्रिडा विकास अनुदान योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील ११ शाळांना प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपये किमतीचे क्रिडा साहित्य उपलब्ध झाले आहे.
मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी क्रिडा साहित्या अभावी क्रिडा क्षेत्रात मागे राहू नये. शिक्षणाबरोबरच त्यांच्या कला गुणांना देखील वाव मिळावा यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मावळतील १० शाळांना प्रत्येकी २ लाख ५० हजार रुपयांचे क्रिडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. मावळातील खडकवाडी (शिवली), काले, कान्हे, पिंपळोली, आढले, चिखलसे, कशाळ, सडवली, साई, येवलेवाडी (नायगयाव) या गावांतील १० जिल्हा परिषदेच्या शाळांना क्रिडा साहित्य उपलब्ध झाले आहे.

error: Content is protected !!