
वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील नियोजित तळेगाव एमआयडीसी टप्पा क्र. ४ मधील समाविष्ट असणाऱ्या आंबळे गावातील संपादित जमिनीच्या मोबदल्याच्या पेमेंटचे वाटप सोमवारपासून संबंधित गावांत जाऊन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
तळेगाव एमआयडीसी टप्पा क्र.४ मध्ये निगडे येथील १११७ हेक्टर, आंबळे येथील ५९८ हेक्टर, कल्हाट येथील ४९२ हेक्टर व पवळेवाडी येथील १८१ हेक्टर असे एकूण २३८८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे.
यापैकी कल्हाट व निगडे या दोन गावांची संपादन प्रक्रिया इको सेन्सेटिव्ह झोनमुळे रखडली आहेतर पवळेवाडीला इको सेन्सेटिव्ह झोन मधून जाणाच्या रस्त्याच्या अडचणीमुळे संपादन प्रक्रिया रखडली आहे. आंबळे गावातील संपादित जमिनीची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊनही पेमेंट मात्र रखडले होते.
यासंदर्भात संबंधित गावातील शेतकऱ्यांनी कृती समितीच्या माध्यमातून अनेकदा आंदोलने केली असून आमदार शेळके यांनी कल्हाट, निगडे व पवळेवाडी ही दोन गावे तूर्त बाजूला ठेऊन आंबळे गावातील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्याने सोमवार (दि. २७) पासून आंबळे गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांना पेमेंटचे वाटप केले जाणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


