कामशेत:
पावसाळा आला आहे,शेतीच्या कामासह माझे वारकरी बांधव आषाढीच्या वारीला गेलेत,काही निघाले आहे. या ऋतूत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे आवाहन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा यांनी केले आहे.
पावसात बाहेरचं अन्न खायला प्रत्येकाला आवडते. पण जर तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला बाहेरचं अन्न टाळावं लागेल. स्ट्रीट फूड बनवताना स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही. अशा स्थितीत अनेकवेळा तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो,याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पावसाळ्यात कच्चे अन्न खाणे टाळावे. या ऋतूमध्ये मेटाबॉलिज्म मंद गतीने काम करते. त्यामुळे अन्न उशिरा पचते. पावसात बाहेरचा ज्यूस आणि सॅलड खाणे टाळा. उशिरा कापलेली फळे खाऊ नयेत,असेही मुथा म्हणाले.
पावसाळ्यात घ्यायच्या काळजी बाबत सांगताना मुथा म्हणाले,”
  पावसात पाण्यात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढू लागतात, त्यामुळे पाणी उकळल्यानंतरच पिण्याचा प्रयत्न करा. उकळत्या पाण्यात सर्व प्रकारचे जीवाणू नष्ट होतात. उकळलेले पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन आणि डायरियासारखे आजार होत नाहीत.
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टी खाव्यात. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, ते या ऋतूत लवकर आजारी पडतात. म्हणूनच तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही काम केले पाहिजे. सुका मेवा, कॉर्न, गहू, बेसन यांसारख्या धान्यांचा आहारात समावेश करावा.
पावसाळ्यात घशाचा संसर्ग झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत तुम्ही थंड पदार्थ जसे की आईस्क्रीम, ज्यूस किंवा शेक पिणे टाळावे. या ऋतूत रेफ्रिजरेटरचे पाणी पिऊ नका. याशिवाय आंबट पदार्थांचे सेवन कमीत कमी करा. यामुळे घसा दुखण्याचा धोका असतो.

error: Content is protected !!